Top News

हेरवाड येथील पाटील मळीत मगरीचे दर्शन

संग्रहित

हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील पंचगंगा नदी परिसरात  असलेल्या पाटील यांच्या मळीत सोमवारी सकाळच्या सुमारास मगरीचे दर्शन झाले. मगरीच्या दर्शनामुळे नदीकाठी जाण्यास अथवा नदीकाठांवरील शेतात काम करण्यास शेतकरी घाबरत आहेत. शेतामध्ये कामानिमित्त शेतकरी नेहमी येत असतात. त्यांना धोका पोहोचू नये यासाठी वनविभागाने त्वरित या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

काही महिन्यापूर्वी पंचगंगा नदीला महापूर येऊन गेल्याने मगरीचा नदीकाठ परिसरात सर्रास संचार वाढला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास अभय आलासे यांना मोटरीजवळ ही मगर आढळून आली. त्यांनी तातडीने स्वाभिमानीचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांना ही माहिती सांगितली. यावेळी पाटील व अन्य शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून परिसरातील शेतकर्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान याबाबत वनविभागाशी संपर्क साधला असून तातडीने या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बंडू पाटील यांनी केली आहे.

थोडे नवीन जरा जुने