राहुल डोंगरे/ शिवार न्यूज नेटवर्क :
कुंभोज ता शिरोळ येथील मधील मेंढपाळ सतीश बंडगर यांच्या मेंढ्या मळ्यात बसायला असताना काल रात्री वन्यप्राण्याचा हल्ला मेंढ्या च्या कळपावर झाला त्या हल्ल्यात मेंढपाळांच्या 1मेंढी व 4 पिल्ली ठार झाली आहेत. तसेच काही बकरी जखमी झाल्या .ही घटना मेंढपाळांना सकाळी समजली . यामुळे सुमारे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले आहे .त्या मुळे मेंढपाळांना मोठा आर्थिक फटका बसला असून राज्य सरकार आणि वन विभाग यांच्या कडून नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी समस्त धनगर मेंढपाळ व्यावसायिक यांची मागणी जोर धरू लागली आहे .
श्री सागर घोदे यांनी ऑल इंडिया धनगर महासंघ चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रा. शंकरराव पुजारी यांना फोन करून सांगताच , त्यांनी तात्काळ इचलकरंजी मधून कुंभोज मधील घटना स्थळी धाव घेतली. तेथील झालेले नुकसान पाहून कोल्हापूर जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षक पठाण सर यांना फोन करून माहिती दिली. तसेच वन विभागाचे वन रक्षक भगवान भंडारी यांना ही घटना स्थळी ताबडतोब बोलवून घेतले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेंगबुरे यांनी मेंढ्यांचे व पिल्याचे पोस्टमार्टम केले .तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथील झालेल्या घटनेचा पंचनामा केला.यांचा सविस्तर अहवाल तयार केला .या घटना स्थळी कुंभोज चे सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश तानगे,श्री सागर घोदे,पत्रकार श्री सचिन भाणुसे , श्री पांडुरंग पुजारी, मेंढपाळ बांधव हे ही उपस्थित होते. तसेच यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष राहुल माने व उपाध्यक्ष अमर पुजारी यांनी ही घटना स्थळी ताबडतोब भेट दिली.
सततच्या होणाऱ्या वन्यप्राणी हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई ताबडतोब मिळावी .आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी ऑल इंडिया धनगर महासंघ चे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा प्रा. शंकरराव पुजारी व यशवंत सेना उपाध्यक्ष अमर पुजारी यांनी केली आहे.