Top News

हेरवाडच्या उपसरपंच पदासाठी विकास माळी यांच्यावर उद्या शिक्कामोर्तब

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शांताबाई तेरवाडे यांनी ठरलेल्या कार्यकालानुसार आपला राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले आहे. या उपसरपंच पदासाठी विकास माळी यांचे नाव चर्चेत असून सोमवारी त्यांच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विकास माळी यांनी पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक एक मधून निवडून आल्यावर गावच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे केली आहेत. एकता युवा ग्रुपच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रमही राबवीत असतात. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना उपसरपंच पदाची संधी मिळणार आहे. आघाडीच्या ठरलेल्या कार्यकालानुसार शांताबाई तेरवाडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे विकास माळी यांचे नांव सध्या चर्चेत आहे. दरम्यान सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  सोमवारी त्यांची निवड होणार असल्याचे समजते. कोणतीही राजकीय कारकीर्द नसताना शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विकास माळी यांनी उपसरपंच पदापर्यंत मारलेली मजल ही खरोखरच कौतुकास्पद आहे.

थोडे नवीन जरा जुने