Top News

रोटरी ग्रीन सिटीच्या जयसिंगपूर शहर अध्यक्षपदी कर सल्लागार सुदर्शन कदम



जयसिंगपूर/ शिवार न्यूज नेटवर्क :

येथील रोटरी ग्रीन सिटीच्या जयसिंगपूर शहर अध्यक्षपदी कर सल्लागार सुदर्शन कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.

छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीच्या रोटरी ग्रीन सिटी ट्रस्ट हॉलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सण 2023- 24 या साला करिता कदम यांची निवड करण्यात आली आहे. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला व असिस्टंट गव्हर्नर नंदकुमार बलदवा यांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. कदम यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

थोडे नवीन जरा जुने