बोरगांव / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उत्तम पाटील यांच्या गटातून निवडून आलेले नुतन नगरसेवक प्रदीप माळी यांचा सत्कार हेरवाड येथील माळी समाजाच्या वतीने करण्यात आला.
बोरगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रदीप माळी हे वार्ड क्रमांक 7 मधून उच्चांकी मतांनी निवडून आले आहेत. उत्तम पाटील यांच्या गटातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या निवडीबद्दल हेरवाड येथील माळी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजाराम माळी, दिलीप माळी, कृष्णा पुजारी, किरण माळी, श्रीकांत इटाज, संतोष माळी यांच्यासह माळी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.