Top News

बिबट्यांच्या हल्ल्यात २४ बकरी ठार ७ जखमी तर चार बकर्‍या बेपत्ता..

 शिराळा तालुक्यातील कापरी येथील घटना

सांगली / शिवार न्यूज नेटवर्क :

कापरी तालुका शिराळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुभाष तुकाराम तांदळे रा.रेड ता.शिराळा जि.सांगली या मेंढपाळाची 24 बकरी ठार तर ७ गंभीर जखमी तर ४ गायब झाली आहेत. या हल्ल्यात सुभाष तुकाराम तांदळे यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती तातडीने मेंढपाळ शरद सुभाष तांदळे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना मोबाईल वरून कळवली संजय वाघमोडे साहेब यांनी ताबडतोब वनविभागाच्या शिराळा परिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिली.       


     

     वनक्षेत्रपाल सचिन जाधव व त्यांच्या टीमने घटनास्थळी रात्रीच तात्काळ भेट देऊन पाहणी केली. परंतु रात्र झाल्याने आज सकाळी ९/१२/२०२१पशुसंवर्धन अधिकारी व वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. रेड तालुका शिराळा येथील *सुभाष तुकाराम तांदळे यांचा दीडशे मेंढरांचा कळप आहे त्यांनी *कापरे येथील जयसिंग केशव पाटील यांच्या तलावाचा माळ जवळ असणाऱ्या शेतात पाच दिवसापासून खतासाठी मेंढरं (तळ )बसवली आहेत. दि.८/९/२०२१ रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास सुभाष घरी जेवण आण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंधार पडला होता दरम्यानच्या काळात बिबट्याने कळपावर हल्ला केला. बिबट्याचे हल्ले शिराळा परिसरात वाढलेले आहेत रोज कुठे ना कुठे तरी बिबट्याचा हल्ला होत आहे. या हल्ल्यांच्या मुळे मेंढपाळ शेतकरी यांचे नुकसान होत आहे दोन दिवसापूर्वी पाडळी येथे बिबट्याने हल्ला करून दोन मेंढरा़ंना ठार केले आहे. तसेच बिबट्या हा जंगल सोडून आता ऊसातच राहु लागला आहे.आणि आत्ता मोठ्या प्रमाणात उसतोड सुरू असल्याने सैरभैर झालेले बिबटे.. गाई,शेळ्या मेंढ्यांच्या वर रोज कुठेना कुठेतरी शिराळा परिसरात बिबट्या हल्ला करत आहे .त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. *बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संजय वाघमोडे यांनी संघटनेच्या


वतीने वनविभागाकडे करण्यात आली.



थोडे नवीन जरा जुने