इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क:
लावलेल्या ट्रॅक्टरला लहान बालकाने जवळ असणारी किल्ली लावल्याने ट्रॅक्टर चालू झाला त्या मुलाकडून गियर पडल्याने ट्रॅक्टर पुढे जाऊ लागला त्यामुळे घाबरून बालकाने चालत्या ट्रॅक्टर मधून उडी मारली असता मागील मोठ्या चाकाखाली सापडल्याने बालक जागीच ठार झाला. ओंकार चंद्रकांत भाटले (वय 15, रा. दत्तनगर, शहापूर इचलकरंजी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.हा अपघात आज गुरुवारी दुपारी दीड वाजता सुमारास घडला. याबाबतची फिर्याद रोहन लक्ष्मण माने (वय 29 रा. घोसरवाड) यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली
घोसरवाड ता.शिरोळ येथील काळम्मावाडी वसाहत तिथं राहणाऱ्या परशुराम नाईक यांनी घरालगतचआपला ट्रॅक्टर क्र( एम,एच 09 सि. एन.6251)लावलेला होता.त्या ट्रॅक्टरवर ओंकार भाटले हा चढुन खेळत असताना त्याने त्याच्या जवळील चावीने ट्रॅक्टर चालू केला ट्रॅक्टरचा गिअर पडल्याने ट्रॅक्टर पुढे जावू लागला घाबरलेल्या ओंकारने चालत्या ट्रॅक्टर मधून उडी मारली असता तो ट्रॅक्टरच्या मागील मोठ्या चाकात पडला ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.