Top News

राजापूरमध्ये जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक ; सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

       राजापूर ता.शिरोळ येथे खिद्रापूर रस्त्यावरील बंधाऱ्या लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा टाकून 15 जणांना अटक करत 13 हजार 230 रुपये रोख रकमेसह मोबाईल,11 मोटारसायकली असा 3लाख,39 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

     राजापूर येथील खिद्रापूर रस्त्यावर रवींद्र सुतार हा शेताच्या पत्र्याच्या शेडमध्ये पैसे लावून तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांना मिळाली असता उपनिरीक्षक किशोर खाडे, पो.हे.कॉ फारूक जमादार,अनिल चव्हाण, शहाजी फोंडे यांच्या पथकाने या ठिकाणी आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजता छापा टाकला असता पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना अड्डा चालक रवींद्र सुतारसह बाळासो पाटील, काका माने, रफिक पटेल, नवाज जमादार, सलीम मुजावर, बाळकृष्ण हिंगमिरे, अर्जुन सुतार, काशिनाथ पाटील, शंकर दलाल, मौला म्हैशाळे, (अकराजण,रा.राजापूर,ता.शिरोळ) बाळासो देसाई(रा. खिद्रापूर,ता.शिरोळ) गणपती माळी,महावीर सुनके, महेबूब कलावंत(तिघे रा.जुगूळ ता.चिकोडी)या 15 जुगाऱ्याना रंगेहाथ पकडून 11 हजार,230रुपये रोख रक्कम,3 लाख,89 हजार रुपये किमतीच्या11मोटर सायकली, ,28 हजार रुपये किमतीची 6 मोबाइल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


थोडे नवीन जरा जुने