कुरुंदवाड/शिवार न्यूज नेटवर्क:
गणेशवाडी ता.शिरोळ येथे घरच्या जागेच्या पूर्वीच्या वादातुन रागाने एकमेकांकडे बघितल्याच्या आणि शिवीगाळ केल्याच्या करणातून झालेल्या दगडफेकीत दोन्ही गटातील 5 जण जखमी झाले आहेत.तर परस्पर विरोधी 4 जणा विरुद्ध येथील पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जखमींच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशवाडी येथील पांडूरंग श्रीपाल मगदूम (वय.35)यांनी कृष्णा कुमार नाईक व कुमार मारुती नाईक (रा.गणेशवाडी ता. शिरोळ)यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कृष्ण नाईक याने रागाने बघितल्याचा जाब मगदूम याने विचारल्याचा राग मनात धरून कृष्णा नाईक आणि कुमार नाईक यांनी संगनमत करून पांडूरंग श्रीपाल मगदूम,श्रीपाल
मऱ्याप्पा मगदूम(दोघे.रा.गणेशवाडी)यांच्यावर दगडफेक करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कृष्णा कुमार नाईक याने पांडूरंग श्रीपाल मगदुम, श्रीपाल मगदूम यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,पांडुरंग मगदूम याने विणाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून पांडुरंग मगदूम आणि श्रीपाल मगदूम यांनी संगनमत करत कृष्णा नाईक,काजोल नाईक,मारुती नाईक या तिघांच्यावर दगडफेक करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.