नागरीक झाले संतप्त
संतोष तारळे/ शिवार न्यूज नेटवर्क :
तुंबलेल्या गटारी, पसरलेला कचरा, चोकप झालेली शौचालये, डासांचे साम्राज्य यासह अन्य समस्यांनी कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक १ मधील नागरीक ग्रासले असून येथील नगसेकांनी निवडणूक तोंडावर आल्याने किरकोळ कामे केल्याने येथील नागरिक संतप्त झालेले आहेत.
यावेळी नागरिकांबरोबर येथील समस्या जाणून घेतली यावेळी नागरिक म्हणाले, निवडणूक तोंडावर आल्याचे पाहून प्रभाग १ मधील रस्ते व गटारी ही दोनच कामे झालेली आहेत. येथील गटार आम्ही स्वत: स्वच्छ करतो. नगरपालिकेचे कर्मचारी इकडे येत नाहीत. इतकेच नव्हे तर इतर गटारी तुंबल्यामुळे या प्रभागातील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. याकडे मात्र लक्ष दिले जात नाही. वारंवार नगर पालिकेकडे तक्रार करुनही आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. तसेच महापूर येवून गेल्यानंतर या परिसरात औषध फवारणी करण्यात आली होती.
यानंतर अनेक महिने झाली तरीही या परिसरात औषध फवारणी करण्यात आलेली नाही. तुंबलेल्या गटारी, पसरलेला कचरा, चोकप झालेली शौचालये, डासांचे साम्राज्य यासह अन्य समस्यांनी कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक १ ग्रासले आहे. पिण्याच्या पाण्याचाही या परिसरात अपुरा पुरवठा होत असल्याने याची खंत बस्ती परिसरातील नागरीकांनी व्यक्त करून येथील नगरसेवक व पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.