Top News

विद्यार्थ्यांनी एचआयव्ही जनजागृतीसाठी योगदान द्यावे : प्राचार्य डॉ. रवींद्र हिरेमठ


एड्स सप्ताहानिमित्त उजळाईवाडीत लक्षवेधी कार्यक्रम

कोल्हापूर/ शिवार न्यूज नेटवर्क :



एचआयव्ही/एड्स सारख्या विषयांवर मनमोकळी चर्चा होत आहे. सेवाभावी संस्था जनजागृती करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एड्स जनजागृतीचा पॅटर्न  रोल मॉडेल ठरत आहे.म्हणून जागतिक एड्स सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी यापुढे कुंडली न बघता एचआयव्ही तपासणी करूनचं विवाह करावेत असे मत उजळाईवाडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे  प्राचार्य डॉ.रवींद्र हिरेमठ यांनी व्यक्त केले.

जागतिक एड्स सप्ताह निमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक,युवा ग्रामीण विकास संस्था ,स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प, सुरक्षा क्लिनिक सीपीआर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल,थुंकीमुक्त चळवळ,श्री.चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळ व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, उजळाईवाडी यांच्या संयुक्त सहयोगाने जागतिक एड्स सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात  एचआयव्ही /एड्स जनजागृती काळाजी गरज  याविषयी प्रकल्प अधिकारी मोहन  सातपुते यांनी मार्गदर्शन केले. सीपीआरच्या समुपदेशिका सौ.श्रीया पाटील यांनी मार्गदर्शन केले.सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या  समुपदेशिका गीता निबाळकर व प्रयोग शाळा तंत्रज्ञ वैशाली पाटील यांचेही सहकार्य लाभले.

 या कार्यक्रमात  एचआयव्ही/एड्सविषयी पोस्टर प्रदर्शन,माहिती शिक्षण व संवाद IEC मटेरिअल वाटप करण्यात आले, ऐच्छिक एचआयव्ही तपासणी ,एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना जगण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून प्रकाशमय मोबाईल टॉर्च व्दारे ऊर्जा निर्माण करण्याचा संदेश व एचआयव्ही/एड्सने मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच  थुंकीमुक्त चळवळ गतिमान होण्यासाठी पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. त्याबरोबर शपथ ग्रहण करण्यात आली.विषमता संपवा,एड्स संपवा व महामारी संपवण्यासाठी जनजागृती पॅटर्न लक्षवेधी ठरल्याने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमास प्रा.प्रशांत सालीयन ,प्रा.अमित बेलेकर, प्रा.प्रदीप राजमाने,युवा संस्थेचे शिवप्रसाद पाटील,कुणाल वाईगडे,अक्षय साळोखे,साताप्पा बोगार्डे,प्रवीण पोवार,दीपाली सातपुते, सर्व विद्यार्थी कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते. प्रा.अमित बेलेकर यांनी प्रास्ताविक केले.प्रल्हाद कांबळे यांनी आभार मानले. 

थोडे नवीन जरा जुने