Top News

दत्तवाड येथे मुस्लिम ओबीसी आरक्षण दिन उत्साहात साजरा

 

इसाक नदाफ/शिवार न्यूज दत्तवाड : 


७ डिसेंबर मुस्लिम ओबीसी आरक्षण दिनाचे औचित्य साधून आज दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रुग्णांना ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्यावतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

७ डिसेंबर १९९४ रोजी मुस्लीम ओबीसी समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या


नेतृत्वाखाली ही संघटना कार्य करत आहे. १९८० साली महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेची स्थापना झाली. आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांनी ही चळवळ सुरू केली. त्यांनी संकल्पना स्पष्ट करून सर्व मुस्लिम समाजाला एका व्यासपीठावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि लोकांना जागृत करून मुस्लिम समाजातील विविध व्यवसायातील लोकांची मने जागृती केली. ७ डिसेंबर हा दिवस सर्वत्र मुस्लिम ओबीसी आरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा मुस्लिम ओबीसी आरक्षण दिन आज दत्तवाड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. एम.जी. बागवान, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई नदाफ, जिल्हा सरचिटणीस अन्सार पटेल, तालुकाध्यक्ष मियाखान मोकाशी, उपाध्यक्ष लाला मांजरेकर, काशिम मुल्ला, बाबासाहेब मुजावर, दाऊद मुल्लाणी, हसन लाडखान, रियाज कुरणे, ग्रा.पं.सदस्य नूर काले, यासीन दानवाडे, हाजी नुरमंहमद नदाफ, मोसिन सय्यद, अल्लाबक्ष डफेदार, प्रशांत कांबळे, रविंद्र कांबळे, के.बी.सिदनाळे, शिवगोंडा पाटील डॉ.वर्षा चव्हाण, औषध निर्माण अधिकारी डॉ. आनंत बोळाज त्याचबरोबर संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने