Top News

पीएसआर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन अँटी करप्शन विंगच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

प्रल्हाद साळुंखे । शिवार न्यूज नेटवर्क :

 पीएसआर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन अँटी करप्शन विंगच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमास पीएसआर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन अँटी करप्शन विंगचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रताप पडळकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष (मायनॉरिटी) जुबेर शेख, मानव आधार फाउंडेशन, ठाणेच्या सदस्या सविता पाटील तसेच सामाजिक कार्यकर्त्या लता भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

पीएसआर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन अँटी करप्शन विंगच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने