Top News

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकास कामांचा शुभारंभ 


जयसिंगपूर । शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही. बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर चालवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक आणि सक्षम बाजार व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीच्या विकासाला गती देण्यात येईल. फ्रान्स आणि नेदरलँड्समधील आधुनिक बाजार व्यवस्थेच्या धर्तीवर भविष्यात मल्टी मॉडेल मार्केट कमिटी उभारण्याचा प्रयत्न असल्याचे रावल यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकरीहिताचा विचार, राजर्षी शाहू महाराजांचा समता व सहकाराचा विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामविकासाचा विचार घेऊन बाजार समितीला आधुनिक रूप देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पनण व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या प्लींथ (जोता) काँक्रीटीकरण कामाचा तसेच भाजीपाला मार्केटमधील व्यापारी गाळ्यांच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, या प्रसंगी नानदार जयकुमार रावल बोलत होते.

स्वागत सभापती शिवाजी चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात माजी सभापती सुभाषसिंह राजपूत यांनी आपल्या विविध मागण्या मंत्री महोदयासमोर मांडल्या. 

या प्रसंगी पुढे बोलताना नामदार रावल म्हणाले, कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळ तालुका हा ऐतिहासिक, सामाजिक तसेच सहकाराचा समृद्ध वारसा लाभलेला परिसर आहे. या भूमीत ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पाण्णा कुंभार, माजी आमदार सा.रे. पाटील तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शामरावजी पाटील-यड्रावकर यांनी केलेल्या कार्याचे नामदार रावल यांनी यावेळी स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले तर गावांची आणि त्यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल. त्यामुळे शेतमालाला योग्य बाजारपेठ, साठवणूक व विक्रीच्या सुविधा उपलब्ध करून देणारी आधुनिक बाजार व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. जयसिंगपूर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकरीहिताचा विचार, राजर्षी शाहू महाराजांचा समता व सहकाराचा विचार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रामविकासाचा विचार घेऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी आधुनिक बाजार व्यवस्था भविष्यातील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती करेल असेही त्यांनी सांगितले.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर बाजार समिती ही केवळ बाजारपेठ नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. जयसिंगपूर शहराची स्थापना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने झाली. याच भूमिकेतून शिरोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची स्वतंत्रपणे स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात शेंगा, गूळ आणि तंबाखूची मोठ्या प्रमाणात आवक होत होती. कालांतराने तालुक्यात सिंचन वाढले, हरितक्रांती झाली आणि ऊस क्षेत्र वाढल्याने बाजारपेठेचे स्वरूप बदलले. त्यामुळे बदलत्या काळानुसार बाजार समितीला आधुनिक सुविधा देणे आवश्यक आहे.

आज बाजार समितीकडे सुमारे ५० एकर जागा उपलब्ध असून, व्यापाऱ्यांसाठी प्लॉट आणि विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र आधुनिक यंत्रसामग्री, गोदामे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी व्यापाऱ्यांना आर्थिक व पायाभूत अडचणी येत आहेत. ग्रामीण गोदाम योजनेच्या धर्तीवर व्यापाऱ्यांना अनुदानाची योजना उपलब्ध करून दिल्यास बाजार यार्डाचा विकास वेगाने होऊ शकतो.

भाजीपाला बाजारपेठ ही मार्केट यार्डची मोठी ताकद असून, कर्नाटक, सांगलीसह रत्नागिरी-सिंधुदुर्गपर्यंत येथून ताजा भाजीपाला पोहोचतो. कोल्ड स्टोरेज, रस्ते व अन्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पणन विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी नामदार रावल यांच्याकडे केली.

या प्रसंगी आमदार अशोकराव माने, रजनीताई मगदूम, अनिलराव यादव, सावकर मादनाईक, संजय पाटील यड्रावकर, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जि. प. सदस्य अमोल चव्हाण, प्राचीता कोळी, उत्तरादेवी शिंदे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, सभापती मनीषाताई कदम, पृथ्वीराज यादव, प्रकाश पाटील टाकवडेकर, नारायण पाटील, कोल्हापूर बाजार समितीचे सभापती नानासाहेब कांबळे, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, कृषी व पणनचे उपव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक निबंधक संदीप शिंदे, अमरसिंह पाटील, प्रताप उर्फ बाबा पाटील, जयपाल कुंभोजे, धनाजीराव जगदाळे, रणजित कदम, महादेव तेली, बाबासाहेब पाटील - हसूरकर, बाबगोंडा पाटील, सुरेश शहापुरे, शिवराज पाटील, रविकांत कारदगे, अण्णासाहेब क्वाणे, सागर शंभूशेटे, वसंतराव जगदाळे, आदिनाथ आरबाळे, रणजित पाटील, राजेंद्र झेले, संभाजी मोरे, मिलिंद भिडे यांच्यासह उपसभापती माधुरी सावगावे सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सचिव सुनील, रामदास गावडे, मुजमिल पठाण, महावीर पाटील, सुरेश माणगांवे, दिपाली चौगुले, दऱ्याप्पा सुतार, चंद्रकांत जोंग, संजय अनुसे, आण्णासो पाणदारे, सिद्राम कांबळे, किरण गुरव, दादासो ऐनापूरे, प्रविणकुमार बलदवा, भगवान पाटील यांच्यासह कर्मचारी यांचे योगदान लाभले. सुत्रसंचलन बबन यादव यांनी केले. आभार विजयसिंह देशमुख यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने