Top News

अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची प्रगतीकडे दमदार वाटचाल : बाहुबली कवटे

अजित कांबळे । शिवार न्यूज नेटवर्क : 

        दूध उत्पादक शेतकरी व संघाच्या संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे बोरगाव येथील अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाने प्रगतीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे. संघाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सभासद संख्या 413 झाली असून, दूध संकलन, कर्जवाटप आणि आर्थिक व्यवहारात संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशी माहिती 

संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवडे यांनी दिली. ते बोरगांव येथील श्री अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत बोलत होते.

प्रारंभी श्री अरिहंत दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले 

पुढे बोलताना बाहुबली कवटे म्हणाले की संघाचे एकूण भागभांडवल 1 लाख 80 हजार रुपये, निधी 19 लाख 26 हजार रुपये, तर ठेवी 34.99 लाख रुपये, खेळते भांडवल 23 हजार 300 रुपये असून हाती शिल्लक 33 हजार रुपये इतके आहे., बँक शिल्लक 1 लाख 100 रुपये आहे. संघाने गुंतवणुकीसाठी ५ लाख ८६ हजार रुपये खर्च केले असून, म्हैस खरेदीसाठी ४ लाख 48 हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. तसेच बिनव्याजी कर्जापोटी 20 लाख 19 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

संघाचे दररोजचे म्हशीचे दूध संकलन 2 लाख 17 हजार 100 लिटर, तर गायीचे दूध संकलन 88 हजार लिटर इतके असून, त्याची एकूण रक्कम १ कोटी ४४ लाख 88 हजार ६०० रुपये झाली आहे. अहवाल सालात संघाला ४ लाख 59 हजार रुपयांचा नफा झाला असून, दूध उत्पादक सभासदांना ६ लाख ४४ हजार रुपयांचा लाभांश देण्यात आला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच पशुधनवाढीसाठी कर्जसुविधा उपलब्ध करून देणे, नियमित दूध संकलन करणे आणि सभासदांना आर्थिक लाभ मिळवून देणे, या माध्यमातून संघाने विश्वासार्हता निर्माण केली आहे असे मत कवटे यांनी व्यक्त केले.

     यावेळी श्री अरिहंत को आप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव चे चेअरमन अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, दुध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज,संचालक शीतल हवले,मायगोंडा पाटील, रावसाब खानबा पाटील, जयपाल कोरवी, हिराचंद चव्हाण,बाळासाहेब माडीवाळ, रमेश माळी,अजित सावाडे, वैशाली बुलबुले यांच्यासह संघाचे पदाधिकारी, संचालक, सभासद, दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने