Top News

शिरढोण–कुरुंदवाड पुलावरील पाणी ओसरत; संध्याकाळपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता

 


हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण–कुरुंदवाड पुलावरील पुराचे पाणी हळूहळू कमी होत असून पुलावर सध्या अंदाजे सहा इंच पाणी आहे. पाण्याची पातळी घटत असल्याने संध्याकाळपर्यंत हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, पुलावर अद्याप पाणी असल्याने काही वाहनचालक धाडस करून त्यातूनच वाहने नेत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाण्याची पातळी याच वेगाने कमी होत राहिल्यास संध्याकाळपर्यंत शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालक या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने