Top News

शिरढोणमधील बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात लवकरच आंदोलन ; शक्तीकुमार कांबळे आक्रमक


हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :


शिरढोण गावामध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शक्तीकुमार कांबळे यांनी दिला आहे.ग्रामपंचायत शिरढोणने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असतानाही कथितपणे बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून गावातील बेकायदेशीर दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी शक्तीकुमार कांबळे यांनी केली आहे.

"दारूमुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत असून गावातील सामाजिक वातावरणही बिघडत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. अन्यथा गावकऱ्यांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, आंदोलनाची तारीख व पुढील भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शक्तीकुमार कांबळे यांनी दिली.

थोडे नवीन जरा जुने