अतिक्रममुक्ती समितीच्यावतीने ग्रामपंचायतीला दिले निवेदन
निगवे खालसा । शिवार न्यूज नेटवर्क :
येथील ग्रामस्थांनी अतिक्रमण मुक्ती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता च्या सुमारास एकत्र येत गावाच्या मुख्य बसस्थानका पासून ते हनुमान मंदिर पर्यंतच्या गावातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची व सर्व गल्लीमधील अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटविण्याची आग्रही मागणी केली आहे.
या बाबत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ज्योती कांबळे व उपसरपंच सुजाता सुतार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी माजी उपसरपंच अशोक किल्लेदार, ग्रा. पं. सदस्य बाबुराव पाटील, शहाजी गोंगाणे , अमित पाटील तसेच ग्रामपंचायत अधिकारी वाय. एस. कांबळे,जयवंत पाटील उपस्थित होते.
तसेच समितीचे प्रमुख वाय. एस. किल्लेदार , प्रताप पाटील, डॉ. चंद्रकांत चौगुले, बाजीराव पाटील, सुनील पाटील, सोनबा गोंगाणे, सागर कोपार्डेकर, बाजीराव पाटील,उमेश पाटील, गणेश कागिनकर, दीपक कांबळे,नामदेव मांडवकर, सागर किल्लेदार अक्षय चौगुले, बाळू कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावचा विकास व नागरी सुविधा साठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी ग्रामस्थांनी आग्रही मागणी केली आहे. ग्रामपंचायत व अतिक्रमण निर्मूलन समितीच्या वतीने गटविकास अधिकारी तहसीलदार, प्रांत जिल्हाधिकारी, यांचेकडे लेखी निवेदन सादर करून ही आग्रही मागणी केली आहे.
