इसाक नदाफ । शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड ता. शिरोळ येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. या भरलेल्या आठवडी बाजारा दरम्यान संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण बाजारपेठेत एकच धावपळ उडाली. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला, तर विक्रेत्यांनी माल भिजू नये म्हणून ताडपत्री, प्लास्टिक व इतर साधनांच्या मदतीने माल झाकण्याची धावपळ केली.
नागरिकांना खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः भाजीपाला, फळे, किराणा व कपड्यांच्या विक्रेत्यांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसल्याचे सांगण्यात आले.
अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ बाजारातील व्यवहार ठप्प झाले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर नागरिकांनी पुन्हा खरेदीस सुरुवात केली आणि बाजारातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. या घटनेची बाजार परिसरात चर्चा सुरू होती.
