Top News

उमळवाड येथील दानलिंग विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

 प्रल्हाद साळुंखे । शिवार न्यूज नेटवर्क :

 आषाढी एकादशी निमित्त उमळवाड येथील श्री दानलिंग विद्यालयात भक्तीमय वातावरणात वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर संचलित या विद्यालयात कन्या विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास गावातील श्री राम भजनी मंडळ, सौ. कल्पना चौगुले, श्री. नेताजी ठोमके, श्री. बबन कांबळे, श्री. प्रकाश पांढरे, श्री. नागेंद्र मोठे, सौ. मिनाक्षी कुंभार, सौ. शारदा पोटेकर, श्री. उत्तम सुतार, श्री. शिवराम कुंभार यांसह वारकरी मंडळी, महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी पालखी पूजनाने करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. अभंग आणि भक्तीगीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

शाळेतील दिंडी गावातून मार्गक्रमण करत श्री दानलिंग मंदिरात पोहोचली. तेथे श्री. प्रकाश पांढरे, सौ. कल्पना चौगुले, सौ. मिनाक्षी कुंभार व सौ. पौर्णिमा गुरव यांनी भक्तिमय गीते सादर केली. विठुरायाच्या गजरात पार पडलेला रिंगण सोहळा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

यानंतर श्री दानलिंग स्वामींची आरती व विठ्ठल-रुक्मिणी आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी श्री दानलिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महाजन सर, कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री. पाणारे सर, कुमार विद्या मंदिरचे श्री. चव्हाण सर, दानोळी केंद्राचे श्री. खिलारे सर, सर्व शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, आषाढी एकादशी निमित्त आयोजित या दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि परंपरेची जपणूक यांचे सुंदर संगम पाहायला मिळाला.

थोडे नवीन जरा जुने