Top News

शिरढोण–कुरुंदवाड पुलावरील जलपर्णी हटविण्याचे काम पूर्ण; वाहतुकीसाठी मार्ग मोकळा

 हैदरअली मुजावर । शिवार न्यूज नेटवर्क :


शिरढोण–कुरुंदवाड पुलावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नदीतील पाणी ओसरल्यानंतरही पुलावरील रस्त्यावर जलपर्णीचा विळखा कायम असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते.

या समस्येची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने कारवाई करत पुलावरील जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर साचलेली जलपर्णी पूर्णपणे हटवून पुलावरील मार्ग स्वच्छ केला आहे.

यामुळे शिरढोण–कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून वाहनधारकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्काळ केलेल्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.

थोडे नवीन जरा जुने