अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावून राज्य सरकारकडून सहकारी रत्न पुरस्कार प्राप्त केलेले आमचे मार्गदर्शक व संस्थेचे प्रेरणास्थान दिवंगत रावसाहेब अण्णा पाटील यांच्या संकल्पनेनुसार सामान्य कुटुंबांना आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक सेवा देण्याचे कार्य अरिहंत उद्योग समूहामार्फत पुढे सुरू ठेवले आहे, असे अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक उत्तमअण्णा पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी शिरगुप्पी गावात बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट संस्था) यांच्या ६२ व्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री अरिहंत को आप क्रेडिट सोसायटी चे चेअरमन श्री अभिनंदन पाटील म्हणाले की दिवंगत रावसाहेब अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरिहंत उद्योग समूहाची मातृसंस्था असलेल्या अरिहंत सोसायटीने आतापर्यंत सुमारे १७२६ कोटी रुपयांच्या ठेवी संकलित करून लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक सहकार्य दिले असून विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वैद्यकीय क्षेत्रातही कार्य सुरू करून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन शाखेचे विधीवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच लॉकर पूजेनंतर शाखेचे नियमित व्यवहार सुरू करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अभिनंदन केले. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पाच कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकृत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कागवाड तालुका कन्नड परिषद अध्यक्ष शिवगौडा कागे, डीकेएसएस साखर कारखान्याचे संचालक महावीर कात्राळे, अण्णासाहेब पाटील, ज्येष्ठ वकील अभयकुमार अकीवाटे, सुरेश पाटील, शिवानंद पाटील, दीपक पाटील, अशोक कात्राळे, विजय अकीवाटे, भीमू भोळे, अप्पासाहेब चौगुले, दयानंद मिनचे, नंदू पाटील, आर.एस. पाटील, अरुण गणेशवाडी, अमर यादव, अरुण कुरुंदवाडे, अनिल चौगुले, अरुण शिरगुप्पे, शंकर पवार, बाबासाहेब जुगुळे, ऋषभ डिग्रजे, चंद्रकांत लंगोटे, रविंद्र भोजे, अशोक मिर्झे, सागर अरबोळे, संतोष चौगुले, सीईओ अशोक बंकापूर, उपाध्यक्ष सतीश पाटील, शाखा व्यवस्थापक बाहुबली मोने यांच्यासह संस्थेचे संचालक, सल्लागार समिती सदस्य, कर्मचारी, हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
