कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील शेतातून पाण्याची मोटार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शावगोंडा रामगोंडा पाटील (वय ६४, रा. माळभाग, हेरवाड ता. शिरोळ) यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या हेरवाड गाव हद्दीतील शेती गट क्रमांक ७५ मध्ये टेक्समो कंपनीची मोनोब्लॉक पाण्याची मोटार बसविण्यात आलेली होती.
दि. १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते दि. १७ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शेतात प्रवेश करून अंदाजे ३ हजार ५०० रुपये किमतीची पाण्याची मोटार चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
