Top News

अब्दुललाटच्या दोन खेळाडूंना कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

 प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट गावातील दोन होतकरू खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. रेणुकुमार ऊर्फ सशांक साळुंखे आणि साईश्वर मोरे यांनी नुकत्याच नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या यशामुळे संपूर्ण गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती सौ मनिषा कदम, गटनेते प्रतिक पाटील, बाबासाहेब वनकोरे,अविनाश पाटील,,नाना उपाध्ये, प्रविण देसाई, दिप्ती जाधव,सीमा म्हेशाळे,दादेपाशा पाटील,जिल्हा परिषद सदस्या सौ,उत्तरादेवी विजीतसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्या,सौ,श्रद्धाताई अविनाश गायकवाड ,सतीश मलमे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन असेच यश संपादन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. अब्दुललाट गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला असून, या यशामुळे इतर तरुणांना देखील प्रेरणा मिळत आहे.


थोडे नवीन जरा जुने