अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
2026 मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित विद्यासागर कन्नड व इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ संस्थेत विशेष नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीच्या दहावी परीक्षेत बोरगांव केंद्रात विद्यासागर इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी कु. अक्षरा संदीप महाजन हिने 95.68 टक्के गुण मिळवून बोरगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय साक्षी खोत हिने 95.84% गुण मिळवून केंद्रात द्वितीय स्थान मिळवले असून समीक्षा हवले हिने 87.04 गुण मिळवून केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर कन्नड विभागात अक्षरा खिचडे 95.04% , संध्या मोतीचंद चव्हाण हिने 95.04% गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर विद्यासागर शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे, शिवराज माळगे 92.96% गुण मिळवून केंद्रात तृतीय व शाळेत द्वितीय क्रमांक मिळवले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले म्हणाले की आमची विद्यासागर शिक्षण संस्था ही सन 2011 पासून कन्नड व इंग्लिश माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत सलग यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकवृंद, संचालक मंडळ आणि संस्था कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सत्कारमूर्ती कु. अक्षरा महाजन म्हणाले की आपल्या यशाचे श्रेय फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याला देत, भविष्यातही अधिक मेहनत घेऊन संस्थेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी कु संध्या मोतीचंद चव्हाण हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. या सन्मान सत्कार कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हावले, उपाध्यक्ष पंपांना म्हैशाळे सर, संचालक अनुज हावले,प्रकाश पाटील, विद्याधर अम्मानावर ,रावसाहेब तेरदाळे शिवाप्पा माळगे, भाऊसाहेब खांनबा पाटील, बाळासाहेब कमते,बाळासाहेब बसनांवर , नंदू हावले, हेडमास्तर एस ए कोळी सह,पदाधिकारी, संचालक मंडळ, शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजू खिचडे सर यांनी केले तर आभार अनिल मनोंळी यांनी मानले. विद्यासागर शिक्षण संस्थेने आयोजित केलेला हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, गुणवंतांचा गौरव करण्याची संस्थेची परंपरा शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी ठरत आहे.
