Top News

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात मोफत ॲडमिशन सेल ची सोय

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १० एप्रिलपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी (Registration) प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोफत ॲडमिशन सेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्णपणे मोफत करून दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

इच्छुक विद्यार्थी व पालकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने