हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नव्या पिढीत संगणक शिक्षणाचे शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे, ही गरज ओळखून हेरवाड हायस्कूलमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे संगणक कक्ष निर्माण केला आहे. याचा फायदा मुलांनी आपल्या करिअर साठी करून घ्यावा असे प्रतिपादन कुरुंदवाड नगर परिषदेचे पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी केले.
साने गुरुजी शिक्षण संस्था कुरुंदवाड, संचलित हेरवाड हायस्कूल मध्ये मुला मुलींच्या शैक्षणिक व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमां मध्ये आधुनिक शिक्षणाची जोड मिळावी यासाठी संगणक कक्ष असणे गरजेचे आहे, मुख्याध्यापक प्रकाश मोहिते, क्रीडा शिक्षक अजित दिवटे लेखनिक व शिरोळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती गोपाळ प्रधाने यांनी विशेष प्रयत्न करून १४ संगणक संच देणगी रूपातून मिळवले. तत्पूर्वी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सचिव अजित पाटील आणि संचालकांच्या वतीने 500 चौरस फुटांचे सर्व सोयनियुक्त कक्षाचे बांधकाम पूर्ण करून दिले होते. या कक्षात आज दिमाखदार कार्यक्रमात मिळविलेले संगणक बसवून उद्घाटन करण्यात आले. सदरचे संगणक कुरुंदवाड नगरपरिषदेतील राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी व अन्य देणगीदारांनी हे संगणक दिले आहेत.
उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे पक्षप्रतोद जवाहर पाटील, त्यांची कन्या श्रद्धा जक्कणावर व हेरवाड गावच्या सरपंच रेखा जाधव यांच्या हस्ते संगणक कक्षाचे फित ओढून उद्घाटन करण्यात आले करण्यात आले.
यावेळी सहाय्यक शिक्षिका मनिषा डांगे, श्रद्धा जक्कणावर व रावसाहेब पाटील यांनी अध्यक्षीय अध्यक्षीय मनोगते व्यक्त केली.
स्वागत हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रकाश मोहिते यांनी केले पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक अजित दिवटे यांनी करून दिला. कार्यक्रमात संस्थेचे सचिव अजित पाटील, संचालिका विजयाताई पाटील, जयश्री थोरत, शालेय समिती सदस्य रावसाहेब पाटील, हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, सदस्य हयातचॅद जमादार, सचिन पाटील, सदस्या सुनीता माने,मोहन मोहिते,शरद अलासे, आशिष मगदूम ,हेमंत डिग्रजे, रियाज जमादार यांची विशेष उपस्थिती होती. संजीवनी निर्मळे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक निर्मळे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कलाशिक्षक धनंजय धोत्रे, मुनिसा पठाण, बिरू देबाजे, सीमा माळी, कल्पना माळी, दशरथ राऊत, पद्मभूषण कांबळे, मौलाआली पोलाद व ओंकार डकरे यांनी परिश्रम घेतले.
