अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जिल्ह्यातील कृषी पतीन संघावर नामनिर्देश संचालकांची नियुक्ती केली जाते .बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने. बोरगांव येथील विवीध कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती हालशुगर संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली.
आज बोरगांव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये विविध उद्देश ग्रामीण कृषी पत्तीन सहकारी संघ PKPS या सोसायटी मध्ये जितेंद्र सिदगोंडा पाटील भोजे व राजकुमार शशिकांत उरणकर,तर जय गोमटेश कृषी संघास महादेव रामु खोत महाराज व ईलाई बाबालाल कापसे, बोरगाव पूर्व भाग ग्रामीण कृषी संघास भाऊसाब केरबा महाजन व भरमा कल्लू कुडचे, पद्मावती विविध उद्देशीय ग्रामीण प्राथमिक कृषी संघास सौ स्वाती संतोष कुडचे व सौ मायाक्का मल्लू खोत यांची नामनिर्देश संचालक निवड करण्यात आली आहे. तसेच जय गोमटेश कृषी संघात संचालक म्हणून भरत बाळासाहेब जंगटे यांची तर आचार्य श्री 108 शांतीसागर क्रेडिट सोसायटीत डॉ. महावीर बंकापूरे यांचे संचालक म्हणून एक मतांनी निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष बी के महाजन म्हणाले की बेळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले व नगरसेवक शरद जंगटे यांनी दिलेल्या संचालक पदाच्या संधीचा उपयोग शेतकरी वर्गाच्या हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार बैठकीस हाल शुगर संचालक ,विद्यमान नगरसेवक शरद जंगटे,बी.के .महाजन, जितेंद्र पाटील, बबन रेंदाळे ,अजित तेरदाळे, बाहुबली पाटील, माजी मुख्याध्यापक एस.बी .पाटील, बाळासाहेब उरणकर, शंकर गुरव ,इलाई कापसे, अण्णा खोत, उत्तम कदम, अजित कांबळे,भरत कांबळे, मल्लू खोत, राजू कुंभार, यांच्यासह नूतन नाम निर्देशित संचालक, व भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
