Top News

जय हनुमान गोविंदा पथक ठरले यादव प्रेमी दहीहंडीचे मानकरी

  तालुक्यातील पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने फोडली



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

अफाट जनसागराच्या साक्षीने यादव प्रेमीच्या तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार, शनिवारी पद्माराजे विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. नभुतो नभविष्य तो, डोळ्याचे पारणे फेडणारे क्षणाक्षणाला अंगावर शहारे उभा करणारी दहीहंडी यादव प्रेमीच्या आयोजित तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिरोळच्या जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने फोडून 1,11,777 रुपये रोख रक्कम पाच फुटी कायम चषक पटकाविले. तर तालुक्यातील पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती गोविंदा पथकाने फोडून 51 हजार 777 रुपये रोख रक्कम व कायम चषक मिळवला.एसपी बॉईज ग्रुपच्या गोविंद पथकाने सात थर करुन यशस्वी प्रयत्न केला. दहीहंडी उत्सवाला महिलांच्या प्रचंड उपस्थितीसह गर्दीने उच्चांक मोडल्याचे पाहायला मिळाले.

स्फूर्ती, उत्साह, आनंद, विद्युत रोषणाई, मनोरंजन, आत्मिक बळ वाढवणा बरोबर युवक तरुणांमध्ये जल्लोष भरणाऱ्या दहीहंडीचे आयोजन युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली, भालचंद्र ठोंबरे,अजित देशमुख, विजयराज कोळी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी केले होते. राजकारण विहरीत, सुसूत्रता, महिलांसाठी खास गॅलरी अशा परफेक्ट नियोजनातून दहीहंडी कशी असावी याचा प्रत्यक्ष अनुभव, शिरोळसह पंचक्रोशीतील दहीहंडी प्रेमींनी घेतला. दहीहंडी उत्सवाचे जनक स्व. शिवाजीराव यादव व माजी आमदार दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या स्मरणार्थ आयोजित दहीहंडी आनंदोत्सवात मुंबई येथील नृत्यविष्काराने चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. उत्सवात युवानेते पृथ्वीराजसिह यादव यांनी आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील कामाची चित्रफीत स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली.सुरुवातीला जयसिंगपूरमधील विशाखा महिला मंडळाने श्रीकृष्ण जन्माष्टमी पाळणा गायिला यानंतर महिला दहीहंडी उत्सवास सुरुवात झाली. दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळ मधील सहा गोविंदा पथकानी सहभाग घेतला जय हनुमान मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, श्री बुवाफन महाराज मंडळ, श्री जय भवानी मंडळ, गोडी विहीर (एस पी बॉईज), विजयसिंह नगर मंडळाच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वच प्रेक्षकांनी डीजेच्या तालावर ठेका धरून दोन्ही संघाचे अभिनंदन केले. 

अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, मा. सभापती कविता चौगुले, शिरोळ न.प.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव, गजानन संकपाळ, पंडित काळे, विजय आरगे, बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण, धनाजी पाटील नरदेकर, संभाजीराव यादव, संजयसिंह यादव, जब्बार मेस्त्री, पोलीस उपनिरीक्षक राऊत मुल्ला, युवा नेत्या जोत्स्ना यादव, अनिता संकपाळ, सुनिता आरगे, गायत्री मुळीक, वंदना पाटील, योगिता कांबळे, दिपाली फल्ले, सुनीता माने यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यादव प्रेमी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



थोडे नवीन जरा जुने