हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
नदीपात्रात ऐन महापुरातही सोडण्यात काळेकुट्ट रसायनमिश्रित उग्र वासाचे सांडपाण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी शिरढोण,टाकवडे,तेरवाड नांदणी पंचगंगा नदीपात्र व परिसरातील पाण्याची पाहणी करून त्याचा पंचनामा करण्यात आला.यावेळी पुरबाधित असंख्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व संतोष हत्तीकर यांनी धारेवर धरत सरबत्ती केली.यावेळी महापुरामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रदूषित पाण्यामुळे आमची शेतातील पिके,बुडालेली घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत संताप व्यक्त केला.यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले तसेच सदरच्या काळ्या सांडपाण्याचा पंचनामा केला.यावेळी शेतकरी सागर टाकवडे,रावसाहेब यमकणमर्डे,सागर हुलमूजगे,विलास बिरोजे,सागर दानोळे, आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शिरढोण पंचगंगा पुलाच्या नदीपात्रातील व साचलेल्या महापुराच्या पाण्याला उग्र वास व काळा तवंग आला आहे.महापुराच्या पाण्यामुळे आधीच त्रस्त असणाऱ्या लोकांना प्रदूषित पाण्यामुळे मरणयातना भोगाव्या लागत असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.
महापुरामुळे नदी काठावरील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाले आहेत.हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आहेत.अशातच हे रसायनमिश्रित सांडपाणी आल्याने काठावरील ऊस पिकांना मोठा फटका बसला आहे.महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा आरोप लोक करत आहेत.
शिरढोण, टाकवडे,नांदणी तेरवाड बंधारा याठिकाणी पंचगंगा नदीपात्र व साचलेल्या पुराच्या पाण्याला उग्र वास व काळाकुट्ट तवंग आला आहे.नदीपात्रात मध्यभागी महापुराच्या पाण्याला लाला तर पात्राच्या दोन्ही बाजूला काळा तवंग वाहताना दिसत आहे.त्यामुळे महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रसायनमिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
