Top News

पाटील कृषी सेवा केंद्र कपिल पाटील यांचेकडून स्वखर्चातून तण नाशक औषध फवारणी



हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण येथील पाटील कृषी सेवा केंद्रचे मालक कपिल पाटील यांचेकडून स्वखर्चातून तण नाशक औषधांची फवारणी करुन घेतले.माळभाग येथील कुमार विद्या मंदिर शाळा व आरोग्य केंद्र दवाखाना येथील आजुबाजुला प्रमाणापेक्षा जास्त तण किचकट झाले होते.लहान मुलांना येथे खेळण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होते.ही बाब लक्षात घेता कपिल पाटील यांनी स्वतः येथे येऊन तण नाशक औषधांची फवारणी करून घेतली.यावेळी कुमार विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक एन.जे.पाटील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आर.जी.भेंडवडे,माजी उपसरपंच राजेखान नदाफ व ग्रामस्थ उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने