अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी तुडुंब साचलेल्या गटारी आणि शहरातील प्रमुख मार्गावर उघड्यावर शौचास बसल्याने शहारात दुर्गंधीयुक्त वातावरण प्रस्तापित झाले आहे.परिणामी डेंग्यू,मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शहरातील स्वच्छता करण्याबरोबर उघड्यावर शौचास बसनाऱ्याना आळा घाला अन्यथा आपण नगरपंचायतीला घेराव घालण्याचा इशारा समस्त भाजप कार्यकर्त्यांसह नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिला आहे.
आरोपात बोलताना नगरसेवक शरदराव जंगटे म्हणाले की, अडीच वर्षांपासून नगरपंचायतीला नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीला प्रलंब लागला होता.त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपंचायत प्रशासनाच्या मनमानी आणि अनाधुंद कारभारामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.ठिकठिकाणी मोठमोठ्या गटारी तुडुंब भरून चक्क गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.त्याचबरोबर शहरातील प्रमुख रस्त्याच्या बाजूला नागरिकांनी उघड्यावर शौचास बसण्याचा चंगच बांधला आहे. तरीही नगरपंचायत पदाधिकाऱ्याने याकडे कानाडोळा केला असून स्वतःची जबाबदारी चिड करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे. परिणामी शहरात वेगवेगळ्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याचे दिसत आहे.असे असतानाही नगरपंचायत प्रशासनाने लाखो रुपयांचा खर्च दप्तरी मांडला असतानाहि त्याचा शहर पातळीवरील स्वच्छतेवर के कवडीमोल हि फरक झालेला दिसत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर गावातील प्रमुख मार्गावर औषधांची फवारणी,कीटकनाशके व गटारीवर दुर्गंधीमुक्त पावडर टाकून शहराला रोग मुक्त करण्याची मागणी केली जात आहे.
बोरगांव शहराच्या मध्यभागी कुंभार तलाव व भाजी मार्केट यार्ड आहे, परंतु त्या परिसरात अजूनही नागरिक उधड्यावर शौचालय करताना आढळतात, जय शिवराय चौक ते गांधी चौक या दरम्यान रस्त्त्या लगत कचरा टाकल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे .बोरगाव ते सदलगा रस्त्या शेजारी एकंदर दोन शिक्षण संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ,परंतु या प्रमुख मार्गावर देखील उघड्यावर शौचाला बसतात, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, शहरात सार्वजनिक मुतरिंचा अभाव आहे. आज केंद्र सरकार. स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना बोरगांव शहर स्वच्छ्ता पासून वंचित का असा सवाल नागरिकांतून केली जात आहे.
नगरपंचायत प्रशासनाच्या अलगर्जी पणामुळे गेल्या अनेक महिन्यापासून वाढणाऱ्या या दुर्गंधीत वातावरणामुळे शहरात सर्वत्र रोगराई पसरल्याने संतप्त शहरवासीयांनी नाराजीच्या प्रतिक्रिया उमटवल्याने आहेत.त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात जर शहारातील भागात स्वच्छता नाही झाल्यास शिवाय उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांवर निर्बंध नाही घातल्यास आपण भाजप कार्यकर्त्यांसह नगर पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन नगरपंचायतीला घेराव घालण्याचा इशारा शेवटी नगर सेवक शरद जंगटे यांनी दिला आहे. यावेळी जितू पाटील, जिन्ना अम्मनवर,प्रकाश पाटील,अमित माळी,अजित कांबळे, राजू लटलटे,महावीर चोकावे-पाटील,अमोल पाटील,बहुबली पाटील,दर्शन चौगुले,राजू कुंभार,धवल भिवरे,उत्तम कदम,गुंडा गोरवाडे, यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
