Top News

सदलगा पोलीस स्थानकातील एएसआय मल्लप्पा अक्कोळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  सदलगा शहरातील श्री मल्लाप्पा अक्कोळे यांनी सदलगा शहरातील पोलीस स्टेशन मधून अखंड 31 वर्षे सेवेनंतर 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सदलगा शहरवासी यांच्यावतीने जंगी नागरी सत्कार विद्यासागर भवन कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

   प्रारंभी परमपूज्य विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर, माजी मुख्याध्यापक श्री बी एस गुंडकल्ले, श्री व्ही जी पत्तार , प्रकाश पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत,आदिनाथ गिजुने, आनंद पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, उदय कुमार पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मल्लाप्पा अक्कोळे व सौ. वैशालीअक्कोळे या उभयतांचा सर्वांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पमाला व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सदलगा पोलीस अधिकारी, सदलगा परिसर पत्रकार बांधव,, कोगनोळे परिवार, मलिकवाड, बेडकिहाळ, भोज मित्र मंडळ, त्याचबरोबर अनेक संघ, संस्था, शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चंदगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन महावीर हुद्दार यांनी केले. या सत्कार समारंभ प्रसंगी सदलगा सह परिसरातील शेकडो नागरिक व राजकीय मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने