Top News

योगेश कांबळे यांनी मत्तीवडेच्या अनाथ आश्रममध्ये केला वाढदिवस साजरा

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

      आज वाढदिवस म्हटले की अनेकांनी डॉल्बी ,मोठ मोठे अनाठाई कार्यक्रम ठेवून आपला वाढदिवसाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळण करतात. परंतु बोरगाव येथील एस . एच.फाउंडेशन चे उपाध्यक्ष योगेश कांबळे या वाहनधारकांनी आपला वाढदिवस मत्तीवडे येथील अनाथ व वृद्धाश्रमात आपल्या सहकारी समवेत साजरा केला. यावेळी आश्रमातील अनाथांना फळे,फराळ,गरजू वस्तू वाटण्यात आल्या. मानव हा समाजशील प्राणी आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाने इतरांना आपण काहीतरी देणं लागतोय ही उदात्त भावना मनात ठेवून फुल, ना फुलाची पाकळी , म्हणुन या भावनेतून बोरगाव येथील सामाजिक कार्याची आवड असलेले वाहनधारक योगेश कांबळे यांनी आपल्या मित्रा सोबत निपाणी तालुक्यातील मत्तिवडे येथील देवांग मनुष्य सेवा संस्था, निर्धारांचा आधार या वृद्धाश्रम व अनाथाश्रम ला भेट देऊन तेथील गरजू व निराधाराणा आपल्या वाढदिवसानिमित्त फळ व फराळ देऊन त्यांच्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला.

   मत्तीवडे तालुका निपाणी येथील या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार यांनी आपल्या अनाथ आश्रम मधील सर्व टीम समवेत बोरगाव येथील योगेश कांबळे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एस.एच. फोंडेशनचे अध्यक्ष सुहास हिरेमणी, उपाध्यक्ष योगेश कांबळे,नितीन कुरळे, अक्षय हिरेमणी,लखन कोरवी,किशोर कुरणे,विजय गोडबोले,प्रकाश कांबळे,विशाल हिरेमनी,श्रीनाथ बोरगावे,विजय हवले,विकी हिरेमनी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने