कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिवसेनेने महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत मताच्या रूपाने उद्धव ठाकरे साहेबांच्यावर दाखवलेला विश्वास विधानसभा निवडणुकीत सार्थकी ठरवण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिकांचा संवाद कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केले आहे.
नृसिहवाडी (ता.शिरोळ) येथील चिमासाहेब जगदाळे पॉलिटेक्निक कॉलेज येथे रविवारी सकाळी साडे बारा वाजता आयोजित मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख उगळे बोलत होते.
या मेळाव्यात शिवसेना नेते,पूर्व विदर्भ,सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्हा विभागीय नेते आम.भास्करराव जाधव उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर,उपनेते,जिल्हाप्रमुख संजय पवार,राज्य संघटक चंगेजखान पठाण,सहसंपर्कप्रमुख अस्लम सय्यद,माजी आम.उल्हास पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी,आजी-माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी वेळेत उपस्थितीत रहावे असे आवाहन केले आहे. यावेळी जिल्हा संघटीका मंगलताई चव्हाण,शिवाजी पाटील, मधुकर पाटील, महेश बोरा ,आनंद शेट्टी ,वैशाली जुगळे ,साजिदा घोरी, राजू पाटील, युवराज घोरपडे ,विकास सुतार,किरण देसाई ,राहुल काकडे ,संजय घोरपडे,प्रतीक धनवडे ,निलेश तवांडकर, सयाजी चव्हाण,बाबासाहेब सावगावे, तेजस कुराडे ,सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.
