Top News

शिरोळ तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी १० कोटी रुपये मंजूर

 'गुरुदत्त ' चे चेअरमन माधवराव घाटगे यांचा पाठपुरावा 



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील उद्योगधंद्यासाठी व पर्यटण वाढीसाठी चांगल्या व दर्जदार रस्त्यांची आवश्यकता होती. तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांसाठी श्री गुरूदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. शिरोळ तालुक्यातील राज्य मार्ग क्र. २०० पासून मजरेवाडी - श्री गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी - घोसरवाड काळम्म्मावाडी वसाहत घोसरवाड नदी पाणवठा ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंतचा प्रजिमा ९२ व घोसरवाड प्रमुख जिल्हा मार्ग ९२ पासून हेरवाड, मजरेवाडी ते दत्त कॉलेज कुरुंदवाड चा रस्ता प्रजिमा - १०४ या रस्त्याच्या रूंदीकरणासह सुधारणा करणेसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या निधीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोउद्योग मंत्रि नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे श्री. घाटगे यांनी सांगितले .

शिरोळ मधिल राज्य मार्ग क्र. २०० ते प्रजिमा क्र. ९२ आणि घोसरवाड पासून प्रजिमा- ९२ ते कुरुंदवाड प्रजिमा- १०४ हेरवाड, मजरेवाडी चिक्कु बाग ( मजरेवाडी बायपास) ते दत्त कॉलेज कुरुंदवाड या रस्त्यांच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी - ३.५ कोटी रुपये , अकिवाट बागी रस्त्यावरील अकिवाट कॉर्नर ते अकिवाट टेक या रस्त्यासाठी २ कोटी रुपये, गुरुदत्त कारखाना शेजारील टाकळीवाडी रोडवरील बाळूमामा कमान ते टाकळीवाडी गावापर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी २.५ कोटी रुपये , तसेच याच रस्त्यांवरील घोसरवाड पाझर तलाव ते काळम्मावाडी वसाहत ( वन विभागाची हद ) या रस्त्यासाठी २ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. वन विभागातील घोसरवाड मार्ग जाणाऱ्या या बायपास रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना कोल्हापूरला जाणेसाठीचा अंतर कमी होऊन प्रवास सुलभ होणार आहे .

यावेळी बोलताना श्री. घाटगे म्हणाले , तालुक्यातील ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर व इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहणांची वर्दळ , अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या, रस्तांचा होणारा वापर व रस्त्यालगत असणाऱ्या गावाची लोकसंख्या लक्षात घेता मंजूर झालेल्या या निधीमुळे तालुक्यातील विविध रस्ते दर्जेदार होऊन प्रवास सुलभ व जलद होण्यास मदत होणार आहे .

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्स च्या माध्यमातून यापूर्वी शिरोळ तालुक्यातील २४ ग्रामीण मार्गाचे रूपांतर ४ प्रमुख जिल्हा मार्गात (एमडीआर) होऊन दर्जोन्नती झाली आहे. या चार प्रमुख जिल्हा मार्गासाठी व अकिवाट - आलास पुलासाठी असा एकूण ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील जनतेचे दळणवळण व शेतमालाची वहातुक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे .

- माधवराव घाटगे

(चेअरमन व कार्यकारी संचालक - श्री गुरुदत्त शुगर्स )


थोडे नवीन जरा जुने