जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने अर्थसंकल्प पुरवणी मागणीतून प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी १५० कोटी, शिरोळ तालुक्यातील रस्ते, तलाठी कार्यालय, मराठा समाज हॉल, जिल्हा मार्ग व राज्य मार्ग यासह विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने १९५ कोटींच्या निधीला तत्काळ मंजुरी दिली असून लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प पुरवणी मागणीतून उदगाव येथील प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी १५० कोटी, शिरोळ तालुक्यातील प्ररामा क्रं.६ पासून अतिग्रे - कबनूर - इचलकरंजी - टाकवडे - शिरढोण - मजरेवाडी - अकिवाट - टाकळी - खिद्रापूर या मार्गाच्या मजबुतीकरणासह सुधारणा करणेकामी ३ कोटींचा निधी, प्ररामा क्रं.६ पासून अतिग्रे - कबनूर - इचलकरंजी - टाकवडे - शिरढोण - अकिवाट - टाकळी - खिद्रापूर रस्ता, आर.सी.सी. गटर्सचे बांधकाम करणेसाठी ८० लाख, निढोरी - गोरंबे - कागल - सांगाव - यळगुड - शिरदवाड -अब्दुललाट - हेरवाड रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे कामी ५ कोटी, प्ररामा क्रं.६ पासून अतिग्रे - कबनूर इचलकरंजी - टाकवडे - मजरेवाडी अकिवाट - टाकळी - खिद्रापूर मध्ये आर.सी.सी. गटर्सचे बांधकाम करणे २ कोटी यासह प्रमुख जिल्हा मार्गासाठी शिरोळ तालुक्यातील रामा क्रं. १५३ पासून कुरुंदवाड नांदणी ते प्ररामा क्र. ६ पर्यंत प्रजिमा क्र. ७३ चे मजबुतीकरणासह सुधारणा करणे यामध्ये कुरूंदवाड ते नांदणी पुल - दीड कोटी, कबनूर - गंगानगर - यड्राव - जांभळी - हरोली - नांदणी - धरणगुत्ती - शिरोळ रस्ता प्रजिमा क्रं. ३१ यामधील नांदणी ते धरणगुत्ती रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
याचबरोबर शिरोळ तालुक्यातील १९ तलाठी कार्यालय आणि १ मंडल अधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी १५ लाख असे ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये दत्तवाड, जुने व नवे दानवाड, सैनिक टाकळी, राजापूर - खिद्रापूर, नांदणी, धरणगुत्ती, हरोली, चिपरी - कोंडीग्रे, शिरढोण, यड्राव, कवठेगुलंद, औरवाड -गौरवाड, जैनापूर, कवठेसार, मजरेवाडी, बस्तवाड, शिरोळ - आगर, अकिवाट, जयसिंगपूर, जयसिंगपूर मंडळ अधिकारी कार्यालय या गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत वारणा मोठे प्रकल्पाच्या कामांना प्रशासकीय मान्यता झाली असून कोथळी समडोळी बंधाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी ७ कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कुरुंदवाड शिरोळ आणि जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी १७ कोटी यामध्ये जयसिंगपूरमध्ये विविध विकास कामे करणे करिता १२. ३५ कोटी, शिरोळ मधील विविध विकास कामांकरिता - २.१५ कोटी,
कुरुंदवाड शहरातील मराठा समाजातील सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी २ कोटी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'ब' वर्ग दर्जा प्राप्त श्री अतिशय क्षेत्र नांदणी ऋषीभाचल (निशिदिका) येथे यात्री निवास बांधणे, स्वाध्याय हॉल, भोजनगृह बांधणे, संरक्षित भिंत बांधणे यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी असा एकूण शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी १९५ कोटी रुपयांच्या पुरवणी निधीला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
.jpg)