अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर ची सुकन्या अन्वी चेतन घाटगे ही वयाची दोन वर्षे आठ महिन्याची असताना ती महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता.या तिच्या यशस्वी कामगिरी साठी इस्लामपूर येथील पिराजी थोरपडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयती निमित्त पिराजी थोरपडे सामाजिक संस्थां व आखिल भारतीय संघर्ष सेना आणि पिराजी थोरपडे आबा वाढदिवस उत्सव कमिटी यांच्यावतीने अण्वि घाटगे ह्या वर्ल्ड रेकॉर्ड बाल गिर्यारोहकीला शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कु.अनवि घाटगे हीच्या नावावर आज पर्यंत चार जागतिक विक्रम ,पाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,पाच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अंविचे नावाची नोंद झाली आहे. आत्तपर्यंत अनविला संघ संस्था, राज्य,राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय असे 182 हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जुलै च्या पहिल्या आठवड्यात अन्विला इस्लामपूर येथील शाहु महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामूळे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ मा पिराजी थोरवडे, विकास डावरे,निखिल वायदंडे, अनिता घाटगे सह परिसरातील मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थीत होते.
