Top News

सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेज येथे इयत्ता ११ वी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

 सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड जुनिअर विभागातील इयत्ता ११ वी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आज संपन्न झाला. या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी. हायस्कूल, कुरुंदवाड च्या मुख्याध्यापिका सौ. व्ही.व्ही.जाधव तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळीच्या मुख्याध्यापिका सौ.एस. ए. अंबुपे ह्या होत्या. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता 12 वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी मधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना 'विद्यार्थ्यांनी आतापासूनच परिश्रम करून आपल्या करिअरची जडणघडण करावी आणि हे करत असताना संस्कारांची शिदोरी सोबत असावी' असे प्रतिपादन सौ. जाधव यांनी केले तर आपल्या जीवनामध्ये कष्ट, जिद्द, चिकाटी निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे असे अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. आंबुपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस. आर. सावगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.आय. शेख यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.एस. कदम उपप्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, आंबूपे सर, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला अधीक्षक बिडकर सर हे उपस्थित होते. आभार कु. एस. एस. पाटील व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ. ए.के. पाटील व कु. वाय. यू. भोसले यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने