शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री दत्त कारखाना हा आपल्याला आपला वाटणारा कारखाना आहे. या ठिकाणी प्रत्येकाचे समाधान आपण करू शकत नाही. पण तरीही अडीअडचणीवर मात करून संस्था पुढे नेणे गरजेचे आहे. राजकारण विरहित आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखाना अतिशय चांगल्या रीतीने चालवला आहे. संचालक मंडळही स्वच्छ, पारदर्शी कारभार करीत आहे. त्यामुळे कर्नाटक भागातून गणपतराव पाटील यांच्या पॅनेलला आम्ही एकतर्फी मतदान करणार आहोत. तरीही गाफील न राहता आणि घरात न बसता जबाबदारीने जाऊन मतदान करायचे आहे. दत्त विकास पॅनेल निवडून आणण्याचा निर्धार करून 'कपबशी' या चिन्हावर शिक्का मारावे, असे आवाहन श्री अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी केले.
श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनेलच्या वतीने बोरगाव, कारदगा, जनवाड, चाँद शिरडवाड, बेडकिहाळ, भोज, भोजवाडी, गळतगा, सदलगा आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला. यावेळी बोरगाव येथे आयोजित सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील यांनी मनोगतातून श्री दत्त विकास पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केले. गणपतराव पाटील यांनी मनोगतातून सहकारी संस्था टिकली तरच सामान्य शेतकऱ्यांचे हित साधले जाऊ शकते असे सांगून दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजना, विस्तारीकरण, शेअर्स रक्कम आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठीची भूमिका विषद केली.
यावेळी व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, सिदगोंडा पाटील, जयपाल नागावे, अशोक बंकापुरे, पिरगोंडा पाटील, राजू मगदूम, मनोज पाटील, अभय करोले, भुजगोंडा पाटील, धन्यकुमार पाटील, राजेंद्र फिरंगण्णावर, प्रदीप माळी, बाबासो वठारे, जयपाल हावले, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब निकम, अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अभय मगदूम यांनी केले. संचालक शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले.
विद्यासागर हायस्कूल बोरगाव येथे मलगोंडा म्हैशाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आण्णासाहेब हावले म्हणाले, स्व. सा. रे. पाटील साहेबांनी हा कारखाना उत्तमरीतीने चालविला आणि त्यांच्या मागे गणपतराव पाटील यांनी त्यांचे विचार जोपासत कारखान्याला प्रगतीपथावर नेले आहे. कारखाना आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेऊन गणपतराव पाटील काम करीत आहेत. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. स्वागत व प्रास्ताविक राजू खिचडे यांनी केले. सूत्रसंचालन किरण नरवाडे यांनी केले. यावेळी संचालक रणजीत कदम, बाबासो बंकापुरे, आप्पासाहेब पाटील, अण्णाप्पा बारवाडे, रावसाहेब तेरदाळे, वसंत तेरदाळे, विजयकुमार शिंगे, बाबासाहेब पाटील, सुभाष गोरवाडे, भाऊसो पाटील, शिवाप्पा माळी, तातोबा सवाडे, बाळासाहेब बसण्णावर, साहेबलाल मोमीन, शिवाप्पा माळी, भरत हावले यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.
कारदगा येथे उपसरपंच किरण टाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी लक्ष्मण पसारे, रामचंद्र कुलकर्णी, आप्पासाहेब कदम, सुभाष खोत, आप्पा सावंत, भाऊसो खोत, बाळासो हांडे, अशोक वैद्य, जनार्दन सदलगे, आताऊल्ला पाटील, देवाप्पा देवकते, कल्लू नागराळे आदी कारदगा, डोणेवाडी येथील शेतकरी सभासद उपस्थित होते.
जनवाड येथे रामा सांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले. उदयकुमार पाटील यांनी पॅनेलला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन नेमू मधाळे यांनी तर आभार जयश्री सांडगे यांनी मानले. मल्लू मुधाळे, निंगप्पा मधाळे, नंदकुमार जांगडे, रामगोंडा पाटील, सनातन मगदूम, ज्योतिबा मोकाशी, सदाशिव मोकाशी, रामचंद्र चौगुले, कुमार मधाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
चाँद शिरडवाड येथे ऍड. रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. स्वागत संजय पाटील यांनी केले तर प्रास्ताविक बंटी पाटील यांनी केले. आण्णासाहेब पाटील, अनिल पाटील, ऍड. रावसाहेब पाटील यांनी गणपतराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रकाश पाटील शिवाई, सुरेश खोत, शितल लडगे, जिवंधर फिरंगन्नावर, सुभाष पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश पाटील, पदमराज पाटील, बाबासाहेब कांबळे, विश्वास इंगळे, धीरज पाटील, अण्णा पाटील, चिंतामणी पाटील, ऍड. विनोद कांबळे, दादासो किनिंगे, शिवगोंडा पाटील, श्रेणीक पाटील, काकासाहेब खरपे आदी उपस्थित होते. सतीश पाटील यांनी आभार मानले.
बेडकिहाळ येथे जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. स्वागत संचालक इंद्रजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोपाळ महामुनी यांनी केले.
मलगोंडा पाटील, तात्यासाहेब भेंडवाडे, सुरेश देसाई, सुदर्शन खोत यांनी कर्नाटक मधील सर्व शेतकरी गणपतराव पाटील यांच्या पाठिशी ठामपणे राहतील असा विश्वास व्यक्त केला. रामचंद्र डोमणे यांनी आभार मानले.
महेंद्र बागे, शंकरराव पाटील, पासगोंडा पाटील, रमेश पाटील, महावीर पाटील, तात्यासो केस्ते, आप्पासो पाटील, भाऊसाहेब खोत, रविंद्र खोत, राजू खोत, भाऊसाहेब शिरगुप्पे, बाबासाहेब खोत, अरुण मगदूम, तात्यासाहेब खोत यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सीमाभागातील सभासदांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा दर्शवित संपूर्ण पॅनेल मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. दौऱ्यात सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गणपतराव पाटील यांनी लगेचच संवाद दौऱ्यास झंझावाती सुरुवात केली होती. कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या गावामध्ये जाऊन, शेतकरी सभासदांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन, आगामी काळात पॅनेलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी उन्नतीच्या, ऊस विकास योजनांच्या आणि एकंदरीत कारखान्याच्या प्रगती संदर्भात चर्चा सुरु केली होती. या दौऱ्यात सभासदांनी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत होते. आजही पॅनेलला मोठा प्रतिसाद मिळाला.
