Top News

शिरोळ रोटरी हेरिटेज सिटीच्या पदाधिकाऱ्यांचा आज पदग्रहण सोहळा

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे नूतन अध्यक्ष तुकाराम पाटील सचिव प्रा के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा पदग्रहण सोहळा आज शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता माने देशमुख मंगल कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इस्माईल पटेल यांच्या हस्ते तर असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडगाणे माजी असिस्टंट गव्हर्नर मेघराज उर्फ नंदकुमार बलदवा यांच्या उपस्थितीत होणार आहे अध्यक्ष तुकाराम पाटील सचिव प्रा के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी 5 वाजता नृसिंहवाडी रस्त्यावरील माने देशमुख मंगल कार्यालयात होणार आहे अशी माहिती रोटरी हेरिटेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (माऊली) व माजी अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी रोटरी हेरिटेज सिटीचे सदस्य डॉ अरविंद माने, डॉ अतुल पाटील डॉ अजितकुमार बिरनाळे डॉ उमेश कळेकर राहुल यादव संजीव पुजारी आप्पालाल चिकोडे सुरेश देशमुख वेदमूर्ती अनिकेत जोशी शरद उर्फ बापू मोरे विराजसिंह यादव संजय रामचंद्र शिंदे उल्हास पाटील डॉ सुभाष भंडारे गजानन पाटील महेश माने रणजीत जगदाळे संदीप कांबळे श्रीकांत जाधव भरत गावडे सचिन सावंत शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने