हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण येथील चर्मकार गल्लीतील राजाराम नारायण आडसुळे यांच्या राहत्या जुन्या घराची भिंत कोसळली आहे.पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे भिंत कोसळली.यामध्ये त्यांचे साधारण ३० हजारांचे नुकसान झाले आहे.येथे अनेक वर्षांपूर्वी आडसुळे यांनी घर बांधलेले आहे.भर वस्तीत हे घर आहे.याठिकाणी कोणी नव्हते त्यामुळे दुदैवी घटना घडली नाही.
