Top News

आजाराला कंटाळून कवठेसारच्या वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

आजाराला कंटाळून कवठेसार ( ता. शिरोळ ) येथील सुकुमार आनंदा संकपाळ ( वय वर्षे ५९ रा. संकपाळ गल्ली) यांनी अमित पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील गट नं. ४७८ मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वैरणीच्या सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची वर्दी तानाजी तुकाराम संकपाळ ( रा. कवठेसार) यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सुकुमार संकपाळ यांना मुळव्याधाचा आजार होता. या आजाराला कंटाळून त्यांनी कवठेसार येथील अमित पाटील यांच्या शेतजमीनीत असणाऱ्या पत्र्याच्या ओपन शेडमध्ये वैरणीच्या सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वर्दीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने