हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शक्ती दिलीप पाटील यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाबासाहेब हेरवाडे होते. राजश्री शाहू आघाडीने ठरवून दिलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने उपसरपंच सौ.रेश्मा शशीकांत चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली होती. या उपसरपंच पदाकरिता शक्ती दिलीप पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच बाबासाहेब हेरवाडे यांनी शक्ती पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. शक्ती पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा होताच पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे व सरपंच बाबासाहेब हेरवाडे यांनी नूतन उपसरपंच शक्ती पाटील यांचा सत्कार केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे ,संभाजी कोळी ,सौ.शर्मिला टाकवडे, सौ मालन कुंभार,सौ. तेजस्विनी पाटील ,भास्कर कुंभार, आरिफ मुजावर, सागर भंडारे,सौ. संगीता चौताळे, सौ. ललिता जाधव, सौ. संगीता मगदूम ,सौ. भारती मगदूम, सौ. अनिता मोरडे सौ. रेशमा चौधरी यांच्या सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
