Top News

हेरवाडचा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर खेळाडू तेजस जोंधळे याची भारतीय रेल्वेत निवड



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड येथील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर खेळाडू तेजस जोंधळे याची खेळाडू कोट्यातून भारतीय रेल्वे खात्यात टीसी पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्याच्यावरच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

     तेजस जोंधळे यांने वेटलिफ्टिंग च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची कमाई करून देशाचे तसेच राज्याचे नाव कानाकोपऱ्यात नेले आहे. याचबरोबर यावर्षीच्या इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत गोल्ड मेडल ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची नुकतीच त्यांनी कमाई केली आहे. त्याच्या या यशाबद्दल खेळाडू कोट्यातून त्याची नुकतीच भारतीय पश्चिम रेल्वेच्या टीसी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

थोडे नवीन जरा जुने