Top News

शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे हिंगणगाव येथे आगमन



हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :

       शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर(ता.शिरोळ,जि.कोल्हापूर)येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कृषीकन्या म्हणून प्रशिक्षणासाठी हिंगणगाव येथे दाखल झाल्या असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.या विद्यार्थिनी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दहा आठवड्याच्या कालावधीमध्ये हिंगणगावात वास्तव्य करतील,तसेच शेतीविषयक माहिती नवीन तंत्रज्ञानाविषयी शेतकर्‍यांमध्ये प्रात्यक्षिकामधून जनजागृती करतील.

                    यावेळी सरपंच श्री.दिपक पाटील, उपसरपंच सौ.कविता कोळी,ग्रामसेवक,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी कृषीकन्यांना या काळात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.यावेळी कृषीकन्यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कृषीकन्या मृण्मयी धनगर, काजल डोंबाळे,अर्पिता कोरे,स्नेहल पाटील व साक्षी वर्णे उपस्थित होत्या. 

                  या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.एस.आर.कोळी,ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन प्रा. एस. एच. फलके,कार्यक्रम समन्वयक डाॅ.आर.टी.कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एस.माळी तसेच विद्यार्थिनी समन्वयक प्रा.आर.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

थोडे नवीन जरा जुने