Top News

निर्भय व धाडस बनण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकरणाची गरज : मुख्याध्यापका माणिक नागावे

 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सावित्रीबाई फुले यांचा निर्धार व धाडस अंगी बाणवले तर आपण कोणत्याही कामांमध्ये यशस्वी होतो असे उदगार श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे मुख्याध्यापिका न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ यांनी राष्ट्र सेवा दल हेरवाड व हेरवाड हायस्कूल हेरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या दस्तानायक शिबिरामध्ये बौद्धिक विभागांमध्ये शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. 

 या निवासी शिबिरामध्ये एकूण ८२ शिबिरार्थींनी भाग घेतला होता. माणिक नागावे यांनी शिबिरार्थींना सावित्रीबाई फुले यांच्या बालपणापासून त्यांच्या जीवनातील अनेक धाडसी आणि प्रेरक प्रसंग सांगून त्यांचा निर्धार त्यांच्या जीवनातील अनेक संघर्षमय परिस्थितीमध्ये कसा उपयोगी पडला हे सांगितले. स्त्री शिक्षणाला व समाज कार्याला वाहून घेतलेले फुले दांपत्य म्हणजेच ज्ञानयोगी क्रांतीसुर्य क्रांतीज्योती अशा पदव्याने त्यांना ओळखले जाते त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. त्यांचे चरित्र समजावून घेतले पाहिजे. असे सांगितले. त्याचप्रमाणे हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच माननीय सौ रेखा जाधव व महिला सदस्यांनी श्रीमती माणिक नागावे यांचा सत्कार केला व त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख धनंजय धोत्रे यांनी करून दिली. यावेळी सतीश सौदे, पांडुरंग पाटील, विजय हेगण्णानावर शालाबाई हेगण्णावर, श्रीकांत निर्मळे, विकास कांबळे व शिबिरार्थी हजर होते.

थोडे नवीन जरा जुने