अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी तालुक्यातील कारदगा ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत तिसरी आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मजा ज्योती अलंकार तर उपाध्यक्षपदी किरण महावीर टाकळे यांनी एक मताने विजय संपादन केले.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आप्पासाहेब पुजारी यांनी काम पाहिले.यावेळी त्यांच्या समर्थकानी फटाके व गुलालाची उधळणीत आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यानी राजीनामा दिला होता.या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटा कडून पद्मजा अलंकार व किरण टाकळे यांनी अर्ज दाखल केला होता तर भाजप गटाकडून वैशाली खराडे व सुकुमार माळी यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी सदस्यानी केलेल्या मतदानात तिसरी आघाडीचे पद्मजा अलंकार व किरण टाकळे यांना १२ तर, विरोधी गटाचे उमेदवार याना ११ मते मिळाली. यावेळी निवडणूक अधिकारी यांनी एका मतांनी तिसरी आघाडी , काॅंग्रेस व , राष्ट्रवादी गटाचे उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले
मावळते व नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व नोडल अधिकारी आप्पासाहेब पुजारी यांचा सत्कार विकास अधिकारी नंदकुमार फपे यांनी केला. विजयी उमेदवारांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढुन छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत बंगाली बाबाचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे म्हणाले सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीही अध्यक्ष व्हावी या उद्देशाने आम्ही जात,पात न सर्वाना समान न्याय व संधी दिली आहे. गावचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने आमचा प्रयत्न राहणार आहे. सरपंच पद्मजा अलंकार व उपसरपच किरण टाकळे म्हणाले, आमचे नेते राजू खिचडे , माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे व सत्ताधारी गटाचे सर्व सदस्य व नेते मंडळी यांनी आमच्या वर विश्वास टाकून अध्यक्ष उपाध्यक्ष पदी निवड केली हि अभिमानास्पद बाब आहे. सर्वांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
