कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहर व परिसरात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली नगरपालिकेच्या वतीने २५ जून ते ३० जून अखेर राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालिकेच्या वतीने पाच दिवस विविध समाजोपयोगी व प्रबोधन पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त पालिका सभागृहात मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून राजश्री शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील, अमोल कांबळे, अजित दीपंकर, अविनाश गोरे, नम्रता कांबळे, विनायक दळवी, आनंदा शिंदे, अर्जुन पाटील आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
