शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
: शिरोळची कन्या व महाराष्ट्र केसरी पै. अमृता पुजारी हिची जॉर्डन देशाची राजधानी अम्मान येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे या निवडीबद्दल पै. अमृता पुजारी चे सर्वत्र कौतुक होत असून शिरोळकरांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
जॉर्डन या देशाची राजधानी अम्मान या ठिकाणी 22 ते 30 जून 2024 दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघातर्फे इंदिरा गांधी स्टेडियम दिल्ली येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीमध्ये 72 किलो वजन गटासाठी मुरगुडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलातील महिला मल्ल व यावर्षीची महिला महाराष्ट्र केसरी पै. अमृता शशिकांत पुजारी हिची भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे .पै. अमृताने या निवड चाचणीमध्ये हरियाणा,दिल्ली,उत्तर प्रदेश या राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला मल्लांना पराभूत करून आपले स्थान निश्चित केले .
या यशासाठी अमृता पुजारी हिला आंतरराष्ट्रीय कुस्ती दादासो लवटे मुरगुडचे माजी नगराध्यक्ष व वस्ताद सुखदेव येरुडकर कुस्ती प्रशिक्षक दयानंद खतकर सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले तर लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा संजय मंडलिक युवा नेते विरेंद्र मंडलिक साईचे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण कार्यवाहक आण्णासो थोरवत डॉ.प्रशांत आथणी यांचे व जय शिवराय एज्युकेशन सोसायटी,कोल्हापूर जिल्हा तालीम संघ , मुरगूड नगरपरिषद,मुरगूड येथील पदाधिकाऱ्यांचे पै पै अमृता पुजारी चे वडील शशिकांत पुजारी आजोबा देवाप्पा पुजारी चुलते बबन पुजारी यांच्यासह पुजारी परिवार यांचे प्रोत्साहन लाभले
दरम्यान अमृता पुजारी हिच्या निवडीबद्दल शिरोळ शहर व परिसरात फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला
